जामनेर

स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीसंदर्भात तरुणांचे निवेदन ; सोमवारी रॅली

शेअर करा !

c073cf37 186f 412f b5cd 9b2ee5ac1265

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विविध मागण्यांसाठी सोमवारी शांतेत रॅली काढण्याची परवानगी देण्यासाठी निवेदन दिले.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

 

तालुक्यातील स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जामनेर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलेय की, राज्य सरकारने १३ हजार पदांची महाभारती जाहीर करावी,महापरीक्षेद्वारे ऑनलाईन लेखी परीक्षा न घेता एमपीएससी मार्फत घेण्यात यावी,यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कॉम्पेटेटिव्ह कट्टा,यश कॉम्प्लेक्स, भुसावळ रोड येथून शांतेत रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शहरातून विविध भागातून शांततेत निघेल. या निवेदनावर विकास सावळे, ऋषिकेश मुळे, मेहुल चौधरी, अरविंद पवार, अक्षय पांढरे, ममता आवटे अनिता पाटील, सौरभ सुरवाडे, राहुल परदेशी, राहुल छजलाने, महेंद्र महाजन, कुणाल जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.