क्राईम, जळगाव

बापरे…तरुणाच्या गुदद्वारात मिरची पूड टाकून मारहाण

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी एका तरुणाच्या गुदद्वारात मिरची पूड टाकून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक शहरातील गोपाळपुरात भागात घडली आहे.

  • new ad
  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • vignaharta
  • Online Add I RGB

याबाबत मिळालेली माहिती अशी की, योगेश्‍वरनगर परिसरातील एका तरूणाने घरगुती कामासाठी विक्की नावाच्या तरुणाकडून १६ हजार रुपये व्याजाने घेतले होते. यातील १० हजार रुपये त्याने वेळेत परत केले. उर्वरित सहा हजार रुपयांसाठी विक्कीने तगादा लावला होता. यामुळे विक्की व त्याच्या दोन साथीदारांनी त्याला शुक्रवारी दुचाकीने गोपाळपुरा भागातील नाल्याकाठी मारहाण केली. यात विक्कीने त्याच्या गुदद्वारासह संपूर्ण अंगावर मिरचीपूड टाकली. यानंतर त्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.