क्राईम, बोदवड

येवती येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

शेअर करा !

death penalty hanging

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील येवती येथे पंचवीस वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी बोदवड पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड येथील हिदायत नगर रहिवाशी शेख नजीर शेख सत्तार यांची मुलगी सुलताना बी शेख युनूस पठाण (वय-25) रा. येवती ता.बोदवड हीने राहत्या घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत विवाहितेच्या पश्चात एक मुलगा, वडील असा परीवार आहे. बोदवडी पोलीसात याबाबत वडील शेख नजीर यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहे.