क्राईम, यावल

यावल येथे विवाहितेचा विनयभंग; चौघांवर गुन्हा

शेअर करा !

crime 4 3

यावल (प्रतिनिधी)। शहरातील गणेश नगर भागात एका 32 वर्षीय महिलेचा अश्लिल भाषा वापरून विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, रमेश रामदास मेथडकर (सुतार), स्वप्निल रमेश सुतार, शर्मिला रमेश सुतार, स्वाती रमेश सुतार मेथडकर सर्व रा.गणेश नगर यांनी 21 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या मुलीने शर्मिला व स्वाती यांना पागल म्हटलेच्या कारणावरून वाद घातला. त्यावरून त्यांनी तिला शिवीगाळ केली. तर रमेश व स्वप्नील यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून जाऊन तिचा हात धरून तुला आता आम्ही पागल पण दाखवतो असे म्हटले व शिवीगाळ करून धमकी दिली. याबाबतची फिर्याद सदर महिलेने यावल पोलिसात दिल्यावरून आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सुजीत ठाकरे करीत आहे.