यावल, सामाजिक

यावल येथे पुरग्रस्तांसाठी स्वातंत्र्यदिनी मदतरॅली

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । कोकणच्या कोल्हापुर, सांगली, सातारा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक नागरीकांचे बळी गेले असुन या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर यावल येथे सकाळी १०.३० वाजतापासून सर्वपक्षीय मदतरॅली काढण्यात येणार आहे.

  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital

या मदतरॅलीत भाजपा, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, मनसे, आरपीआय, पी.आर.पी, समाजवादी पक्ष, सामाजीक संघटना, यावल व्यापारी मंडळ, ग्राहक मंच, शिक्षण संस्था, शिक्षक संघटना, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, शासकीय व अशासकीपसंयटनाच्या सहकार्याने मदतफेरी चे आयोजन करण्यात आले असुन अशी सर्वपक्षीय रॅलीसाठी यावलंकरानी या सामाजीक कार्यात आपला सहकार्य नोंदवावा असे आवाहन सर्वपक्षीय सदस्य यांनी केले असल्याची माहीती प्रा. मुकेश येवले यांनी कळविले आहे.