अमळनेर

बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थीनीचे नुकसान.

शेअर करा !

अमळनेर प्रतिनिधी । वैशाली एकनाथ मैराळे हिला पेपर फाटल्याचे कारण देऊन बोर्डाने भोंगळपणाचा कळस गाठला असून या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी तिच्या भावाने केली आहे.

advt tsh 1

वैशाली एकनाथ मैराळे, बैठक क्रमांक ७-१२०३२३ ही या वर्षी बारावीला होती. मार्च महिन्यांत तिची परिक्षा झाली. त्यावेळेस कॉपी अथवा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराबाबत कारवाई झालेली नव्हती. मात्र निकालात तिला डिपार दाखविण्यात आले आहे. याबाबत बोर्डाकडे चौकशी केली असता तिचा पेपर फाटल्याचे कारण देण्यात आले. तथापि, असला कोणताही प्रकार घडलेला नसून पेपर तिने फाडलेला नाही. असे तिने चौकशी वेळी बोर्डात चौकशी अधिकार्‍यांसमोर लिहून दिले होते. मात्र याचा फटका तिला सहन करावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे पेपर फाटल्याच्या कारणावरून एकाही विद्यार्थ्याला डिपार करण्यात आले नसतांना वैशाली मैराळे हिला मात्र याच कारणावरून अनुत्तीर्ण केल्याने तिच्यासह तिचे कुटुंब हताश झाले आहे. यामुळे तिचा भाऊ समाधान मैराळे याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. बोर्डाने येत्या ०८ दिवसांत हा अन्नायकारक निर्णय बदलला नाही अगर मागे घेतला नाही तर दिनांक २१ जुन रोजी आपण आत्मदहन करणार असून याची जबाबदारी बोर्डासह प्रशासनाची राहणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.