क्रीडा, राष्ट्रीय

कुस्तीपटू राहुल आवारेने जिंकले कांस्यपदक

शेअर करा !

rahul aaware

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | भारताचा युवा कुस्तीपटू राहुल आवारेने आज (दि.२२) जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात पाचवे पदक आले आहे. राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

कझाकिस्तानच्या नूर सुल्तान येथे ब्रॉन्ज मेडल सामन्यात राहुल आवारेने अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याला पराभूत केले. दरम्यान, ऑलिम्पिकच्या न येणाऱ्या गटात राहुलने पदक पटकावले आहे. त्यामुळे या पदकानंतरही तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणार नाही. या आधी दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. नूर-सुलतान, कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या या जागतिक कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगट, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दाहिया यांनी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.