राजकीय, राष्ट्रीय

मृत्यू पत्करेन पण मोदींच्या आई, वडिलांचा अपमान करणार नाही : राहुल गांधी

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी फार द्वेषाने बोलतात. त्यांनी माझे वडील, आजी आणि आजोबांचा अपमान केला. पण मी आयुष्यात कधीही त्यांच्या कुटुंबावर, आई, वडिलांवर टिप्पणी करणार नाही. मृत्यू पत्करेन, पण त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही, असे राहुल गांधी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले आहे.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB

 

 

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी आरएसएस किंवा भाजपाचा माणूस नाही, पण काँग्रेसचा आहे. त्यांच्या द्वेषाला मी प्रेमाने उत्तर देईन. गळाभेट घेत, प्रेमाने आम्ही नरेंद्र मोदींचा पराभव करु. राहुल पुडे म्हणाले की, काही दिवसाआधी एअर स्ट्राईकच्या आधी ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते. मात्र भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला दिल्याचे मोदी म्हटले होते. खराब हवामानामुळे जर विमानं रडारवर दिसत नाहीत तर मग पाऊस पडल्यावर ही विमानं गायब होतात का? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.