क्राईम, जळगाव

व्हॉटसॲपवर तलवारीचा फोटो टाकणारा एलसीबीच्या ताब्यात

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

15

जळगाव प्रतिनिधी । व्हॉटस् ॲप वरून तलवारीचा फोटो व्हायरल करणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातील तलवारही हस्तगत केली असून आर्म ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akshay Trutiya

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन प्रकाश सोनवणे वय ३८ रा.शामनगर, वाघनगर याने तलवारीसह व्हॉटस्ॲपवर फोटो व्हायरल केला होता. सापळा रचत सचिन सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याने झाडात लपवलेली तलवार पोलीसांना काढून दिली. याबाबत यांच्यावर हत्यार कायदांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना सांगून पोहेकॉ चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील, पोहेका श्रीकृष्ण पटवर्धन, पोहेका दिनेश बडगुजर, पोहेकॉ सुनिल दामोदरे, चालक पोहेका विनय देसले, पोना संदीप साळवे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोना नरेंद्र वारुळे, महिला पोहेका ललिता विठल सोनवणे यांनी कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published.