धरणगाव, राजकीय

विवरे येथे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ रॅली

शेअर करा !

madhuri attarde news

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ माधुरीताई अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा विवरे येथे संपन्न झाला.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

गावातील महिलांनी माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले व चंद्रशेखर अत्तरदे यांच्या विजयासाठी गावकऱ्यांनी देवाकडे साकडे घातले. धरणगाव तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच विवरे गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच धरणगाव शहरातील नगरसेवक कैलास माळी, ललित येवले, शिरीष बायस, यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.