राजकीय, रावेर

विरोधक नसल्याने आमच्यातच हाणामाऱ्या करतोय – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

रावेर (प्रतिनिधी) । हाणामाऱ्या करायला कोणीही विरोधकच शिल्लक नाही म्हणुन आम्ही आमच्यातचं हाणामाऱ्या करतोय जिल्हात भाजपाच्या ताब्यात सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा असल्याने राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षाचे जिल्ह्यात सुपडा-साफ असल्याने विरोधक सुध्दा साफ झाले असल्याचे प्रतिपादन भाजपाचे संकटमोचक नेते तथा जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी केले.

  • advt tsh 1
  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • vignaharta
  • new ad

आज रावेर भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनीधीची व शिवसेनेची संयुक्त बैठक संपन्न झाली. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदशर्न करीत होते. यावेळी रावेर आमदार हरिभाऊ जावळे, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रल्हाद महाजन, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, रावेर तालुका भाजपा अध्यक्ष सुनील पाटील, रावेर तालुका शिवसेना अध्यक्ष प्रवीण पंडित, रिपाईचे आनंद बाविस्कर, वासुदेव नरवाडे आदी भाजपा शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.