क्राईम, जळगाव

विरावली येथील तरुणाची विषारी औषध घेऊन आमहत्या

शेअर करा !

Crime

जळगाव प्रतिनिधी । यावल तालुक्यातील विरावली येथील २८ वर्षीय तरुणाने गुरुवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

  • advt tsh flats
  • spot sanction insta
  • Sulax 1

कोमलसिंग बळीराम पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. कोमलसिंग हा अविवाहीत तरुण होता. गुरूवारी सकाळी 9 वाजता त्याने राहत्या घरात विषारी औषध घेतले. यामुळे अत्यवस्थ झालेल्या कोमलसिंग याला कुटुंबियांनी सुरूवातीला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतरही त्याची प्रकृती स्थिर होत नसल्यामुळे त्याला दुपारी दोन वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुन्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोमलसिंग याने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तो शेतीकाम करुन उदरविर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.