क्राईम, चोपडा

विरवाडे येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यु

शेअर करा !

Cobra crime

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील विरवाडे येथील रहिवासी भुरला भिलाला हा तरुण रविवारी सकाळी जंगलात गुरे चरण्यासाठी गेला असतांना सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

 

सविस्तर वृत्त असे की, भुरला प्यारसिंग भिलाला (बारेला) (वय-२६) हा तरुण रविवारी सकाळी जंगलात गुरे चरण्यासाठी घरून सकाळीच निघाला होता. तो दुपारी घरी येत असल्यामुळे तो का आला म्हणून नातेवाईकांनी शोधा-शोध केली. तर तो बोर अजंटी शिवारात आढळून आला. त्याला त्याच अवस्थेत चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने अमळनेर जवळ-पास असतांनाच त्याचा जीव गेला. डॉ. सचिन कोल्हे यांच्या खबरीवरून त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हे, ज्ञानेश्वर जवागे, मधुकर पवार व निलेश लोहार हे करीत आहेत.