चाळीसगाव, राजकीय

मंगेश चव्हाण यांचा १८ गावात प्रचारदौरा

शेअर करा !

mangesh prachar

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील मतदार संघातील भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांनी आज (दि.९) १८ गावांमध्येप्रचार दौरा केला. ठिकठिकाणी त्यांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

या दौऱ्याचा शुभारंभ शहरातील नारायण वाडी येथील देवीमाता मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर टाकळी प्र.चा. ओझर, पातोंडा, मुंडखेडा खु., मुंडखेडा बु., बोरखेडा खु. आदी गावागावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी सुवासिनींनी मंगेश चव्हाण यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रचारदौऱ्यात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला.

त्याचवेळी विधान परिषदेच्या आमदार सौ.स्मिताताई वाघ यांनीही त्यांच्या प्रचारदौऱ्यात सहभागी होऊन पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी, पं.स. सभापती-उपसभापती, नगराध्यक्षा, जि.प. व पं.स. सदस्य, नगरसेवक सर्व गावातील सरपंच- उपसरपंच, शक्तीकेंद्र-बुथकेंद्र प्रमुख, पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.