कोर्ट, क्राईम, यावल

विद्यार्थीनीशी अश्लिल वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पोलीस कोठडी

शेअर करा !

yawal news

यावल, प्रतिनिधी । येथील खाजगी शिकवणी क्लासेसमध्ये शिकवणीला येणाऱ्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला शनिवारी अटक करण्यात आली होती. आज रविवारी आज न्यायलयात हजर केले असता त्यांना कोठडी मिळाली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

यासंदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील न्यू व्यास नगरी मधील शिकवणी घेणाऱ्या वर्ग चालक संशयीत आरोपी अभिषेक छेदीलाल पाल, वय २५ वर्ष रा. कानपुर, उतरप्रदेश ह. मु. उल्हासनगर मुंबई कडुन शहरात राहणाऱ्या एका १२ वर्षीय शिकवणीला येणाऱ्या बालीकेशी मागील दोन महीन्यापासुन क्लासेस मध्येच असलेल्या एका खोलीत त्या मुलीशी लज्जास्पद अश्लील चाळे करीत होता. १८ सप्टेंबर रोजी त्या बालीकेशी अश्लील चाळे करीता असतांना त्या बालीकेच्या आईने पाहील्यावर या घटनेतील विरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान शहरात एका शिक्षणाचे ज्ञानदान करण्याचा पवित्र मंदीरात अशा प्रकारे एका शिक्षकाने अशा प्रकारे लाजीरवाणी कृत्य केल्याने सामाजीक कार्यकर्ते व पालकवर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. यावल शहरातील न्यु व्यास नगर परिसरात मागील दिवसापासुन संशयीत आरोपी अभिषेक पाल यांने आर्क फाउंडेशन या नावाने खाजगी शिकवणी घेत होता. या शिकवणी क्लासेसला सुमारे ४०० विद्यार्थीनी व विद्यार्थी शिकवणी घेत होते. आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी पोलीस उप निरिक्षक जितेन्द्र खैरनार, यावल तहसीलचे बी.व्ही. पाटील आणि तलाठी समीर तडवी यांच्यासह बालीका व तिची आई यांच्या समक्ष घटनास्थळी जावुन पंचनामा करण्यात आला. यावल येथे नागरीकांच्या मनाला प्रचंड संताप देणाऱ्या या घटनेमुळे शहरातील भाडेतत्वावर घरे देणाऱ्या घरमालका समोर एक मोठे प्रश्न निर्माण झाला आहे. परपरांतीय नागरीकांना किंवा अनओळखी व्यक्तिला घरभाडयाने देण्यासंदर्भात घरमालक हे शासनाच्या असलेल्या कायद्याची अमलबजावणी करतांना दिसुन येत नसल्याने येणाऱ्या काळात या पेक्षाही मोठी घटना होवु शकते याची दक्षता घेणे शहरातील प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे.