जळगाव, राजकीय

विधानसभा निवडणूक तयारीसाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेसची बैठक

शेअर करा !

congress news

जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती. आगामी विधानसभेच्या तयारी संदर्भात आयोजित जळगाव शहर जिल्हा काँग्रेसची बैठक शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

याप्रसंगी बुथ रचना आढावा व इतर संघटनात्मक तयारी विषयी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, ग्रामिण जिल्हाध्यक्ष संदिपभैय्या पाटील, उदय पाटील, उल्हास साबळे, उत्तमराव सपकाळे आदिंनी मार्गदर्शन केले. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी ही मते मांडली.

डॉ. उल्हास पाटील यांनी प्रत्येक भागात शाखा, प्रत्येक बुथवर युवा कार्यकर्ते असलेच पाहिजे. सांघिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जुने व नवीन कार्यकर्ते यांचा समन्वय घडवा. संघटनात्मक तयारीसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी कॉंग्रेसचे गात वैभव मिळवण्यासाठी सर्न्वांनी जोमाने काम करणे गरजेचे आहे, त्यासाठी एक दिलाने प्रामाणिकपणे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी वाहून घ्यावे, असे सांगितले. उदय पाटील यांनी बुथ रचना जमिनीवर अस्तित्वात असणे गरजेचे आहे, फक्त कागदावर नको असे सांगितले.

या बैठकीला नदीम काझी, भैय्यासाहेब अनिल पाटील, वसंतराव सोनवने, स्वामी रेनापुरकर, अॅड. प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर कोळी, छोटू खडके, श्याम तायड़े, जमील शेख, बाबा देशमुख, देवेंद्र मराठे, शफी बागवान, अमजद पठाण, संदीप तेले, योगेश देशमुख, जाकीर बागवान, अमिना तडवी, प्रदीप सोनवणे, सागर सपके, परवेझ पठाण, राजेन्द्र महाजन, मोहसिन पिंजारी, मनोज सोनवणे, शशि तायडे, तुळशिराम जाधव, विष्णू घोडेस्वार, सुरेश तितरे, गोकुळ चव्हाण, पी.जी.पाटील, नंदकुमार भारंबे, दिलीप बोरसे, भरात गुर्जर, संजयसिंग पाटील, नानासाहेब साठे, काफिल शीख, अजमल शह, निनाजी गायकवाड, सुरेंद्र कोल्हे, सलीम पटेल, नूर बागवान, जमील कुरेशी आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.