राजकीय, राष्ट्रीय

गटबाजीला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिला : सत्यजीत तांबे

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उर्मिला मातोंडकर या पक्षातल्या गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या असल्याचे म्हटले आहे.

advt tsh 1

 

पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या उर्मिला मातोंडकर यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. उर्मिला यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या पाठिशी असल्याचेही तांबे यांनी जाहीर केले आहे. उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपला फारसा परिचय नाही. असे असले तरी त्या आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत, याची आपल्याला कल्पना आहे. म्हणूनच त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाहीत, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. आपले मत व्यक्त करताना तांबे यांनी, उर्मिला यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेध करण्याजोगी असल्याचे म्हटले आहे.