चाळीसगाव, राजकीय

राजकीय भूकंप : स्मिता वाघांऐवजी आ. उन्मेष पाटील यांना भाजपची उमेदवारी

शेअर करा !
वाचन वेळ : 3 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे आधी जाहीर केलेल्या आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट दिल्याने खळबळ उडाली आहे. आमदार उन्मेष पाटील यांना पक्षाने कामाला लागण्याचे आदेश दिले असून ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 • NO GST advt 1
 • linen B

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपची पहिल्यापासून संभ्रमाची स्थिती असल्याचे दिसून आले आहे. खासदार ए.टी. नाना पाटील यांना तिसर्‍यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित असतांना सोशल मीडियातील कथित आक्षेपार्ह छायाचित्रांमुळे ए.टी. नानांना उमेदवारी नाकारण्या आली. त्यांच्या ऐवजी अनेक जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यात अभियंता प्रकाश पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेष पाटील यांची नावे समोर आली. तथापि, ऐन वेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला. खुद्द ए.टी. नानांनी वाघ सोडून अन्य उमेदवार चालणार असल्याचे जाहीर केले. तर अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही वाघ यांना विरोध केला. यामुळे अखेर आमदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपच्या या निर्णयामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात टक्कर होणार आहे.

दरम्यान, आमदार उन्मेष पाटील यांनी आपल्याला पक्षाकडून कामाला लागण्याचे निर्देश मिळाले असून यानुसार आज सायंकाळी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होणार असून उद्या अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजशी बोलतांना दिली.

कोण आहेत उन्मेष पाटील ?

उन्मेष पाटील हे चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार असून यांचा बायो-डाटा खालीलप्रमाणे आहे.

नाव: उमेश भैयासाहेब पाटील

मातेचे नाव: मंगलबाई

जन्म तारीख: २४-०६-१९ ७८

ईमेल आणि संपर्कः र्ीपाशीहलिूरहेे.लेा ९४२३९७६३८८/७७५७९५२०१४

पत्नीः संपदा उन्मेष पाटील (एम.एससी, बी.एड., एम.एड.)

शैक्षणिक पात्रता

केमिकल इंजिनियरिंग मधील डिप्लोमा

ओ. बी. केमिकल इंजिनियरिंगमध्ये

पेशा :- राजकारण, व्यापार आणि कृषी

कार्यालयीन पत्ता : उमंग, समथथ हॉस्पीटल, कॅप्टन कॉर्नर, भडगाव रोड, चाळीसगाव, जि. जळगाव (महाराष्ट्र) – पिन – ४२४१०१ फोन नं. (०२५८९-२२८८८०)

छंद : – सामाजिक कार्य, वाचन, प्रवास

सध्याचे पद

* सदस्य विधानसभा (एमएलए) १७ – चाळीसगाव कॉन्सट्युट्यूसी (२०१४)

* सदस्य, महाराष्ट्र राज्य अंदाजपत्रक समिती (२०१७)

* माजी सदस्य, पंचायत राज समिती, महाराष्ट्र राज्य (२०१५ ते २०१७)

* भारतीय महासचिव भारती जनता युवा मोर्चा

* युवा नियोजन समितीचे सदस्य, महाराष्ट्र शासन

* उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष

* अध्यक्ष, वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळ

* अध्यक्ष, एस.एस.सी. पॉलिटेक्निक कॉलेज, चाळीसगाव

* अध्यक्ष, उमंग पारधा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

* माजी अध्यक्ष, जेसीआय चाळीसगाव शहर

* सीनेट सदस्य- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

पुरस्कार आणि सन्मान

* युवा संसदेच्या सर्वोत्तम सभापती म्हणून संसदीय आणि व्यवहार मंत्रालयाने पुरस्कृत केले

* समता शिक्षण परिषदेने शिक्षण रत्न पुरस्काराने गौरव

7 Comments

 1. Sandip Mali

  दादा namo again

 2. Anonymous

  दादा100% निवडून याल निवडून आल्यावर वडगावलांबे. चाविकासाकडेही लक्ष द्या…पाच वर्ष दुर्लक्षीत रहीलेल गाव आहे…

 3. Sunil bapusing patil

  Modi मुळे विजय निश्चित वाघ आसो कि पाटील .

 4. मनोज रमेश पाचपांड़े

  दादाआपलाच विजय 100%

 5. Ravindra Ramdas mahajan.

  मा.दादा मी तुमचा प्रचार करेल

Leave a Comment

Your email address will not be published.