पाचोरा, राजकीय

उध्दव ठाकरे यांची सभा लांबणीवर जाण्याची शक्यता

शेअर करा !

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पाचोरा येथील सभा लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत माहिती अशी की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पाचोरा येथे सभा घेणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. या सभेच्या माध्यमातून उध्दव ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे मानले जात होते. या सभेसाठी शिवसेनेनेही अतिशय जय्यत तयारी सुरू केली होती. मात्र माजी आमदार तथा पक्षाचे जळगाव लोकसभेचे संभाव्य उमेदवार आर.ओ. पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांची सभा तूर्तास लांबणीवर ढकलण्यात आली आहे. याबाबत नंतर तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.