क्राईम, राज्य

पिंपरीत दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) महाविद्यालयातील कार्यक्रमात झालेल्या वादातून चाकणच्या खराबवाडीत शुक्रवारी रात्री दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे.

  • linen B
  • NO GST advt 1

प्रशांत बिरदवडे मृत तरुणाचे नाव आहे. तर पियुष धाडगे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी पियुष धाडगे आणि अक्षय शिंदे या दोघांमध्ये गेल्या वर्षभरापासून वाद सुरु होता. अगदी एकमेकांकडे पाहण्याचे निमित्तानेही त्यांच्यात भांडण होत असायचे. अक्षयला कुठून तरी खबर लागली होती की पियुष त्याचा खून करणार आहे. तत्पूर्वी आपणच त्याचा काटा काढायचा असे त्याने मित्रांसोबत कट रचला. मग पियुषला फोन करुन वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावले. प्रशांत बिरदवडेसोबत पियुष अक्षयला भेटायला गेला होता. मात्र अक्षय सात ते आठ मित्रांसोबत पियुषला संपवायच्या उद्देशाने पोहोचला. चर्चा सुरु होताच अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पियुषवर कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने प्रहार करायला सुरुवात केली. पियुषने जखमी अवस्थेतच तिथून पळ काढला. पण पियुष आणि अक्षय यांच्या भांडणात प्रशांतचा नाहक बळी गेला.

Leave a Comment

Your email address will not be published.