क्राईम, पाचोरा

नांद्रा येथे वेगवेगळ्या घटनेत दोन बालकांचा मृत्यु

शेअर करा !

nandra

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील दोन वेगवेगळ्या घटनेत सहा वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून तर तेरा वर्षाच्या मुलीचा स्वाइन फ्लू आजाराने मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

advt tsh 1

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील नांद्रा गावातील सोमू नरेंद्र तावडे (वय 6) याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे.
मयत मुलगा सोमू तावडे हा सैन्य दलातील सैनिक नरेंद्र तावडे यांचा मुलगा व सरपंच शिवाजी तावडे यांचा पुतण्या होता. सुटीवर आलेल्या वडीलांसोबत तो फिरायला गेल्या असता. त्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

तर दुस-या घटनेत याच गावातील रहिवासी सध्या नाशिक येथे वास्तव्यला असलेल्या रुचिता समाधान तावडे (वय 13) हीचा स्वाइन फ्लू या आजाराने नाशिक येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रुचिता ही ह.भ.प.लोटन महाराज यांची नात होती. या अनपेक्षित झालेल्या दुर्देवी घटनेने नांद्रा गावात शोककळ पसरली आहे.