क्राईम, जळगाव, भुसावळ

गॅस हंडी अन दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

5e78e709 5614 459a bcc9 d93861d66149

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ येथून २ मे रोजी घरात एकट्या असलेल्या महिलेस फसवून तिच्याकडून गॅस हंडी व दागिने चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाण येथून अटक केली आहे, त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करून त्यांना भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

  • vignaharta
  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • new ad

 

अधिक माहिती अशी की, २ मे रोजीच्या घटनेनंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. त्यानुसार पो.नि. बापू रोहोम, सपोनि रवींद्र बागुल, पोउनि कैलास पाटील, हे.कॉ. अनिल इंगळे, संजय सपकाळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, रमेश चौधरी, अनिल देशमुख, दीपक पाटील, इद्रीस पठाण व दर्शन ढाकणे यांनी पथके बनवून आरोपींचा शोध सुरु केला होता. त्यामध्ये आरोपींनी अशाच प्रकारचे गुन्हे अकोला ब बुलढाणा जिल्ह्यातही केल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली होती. याच दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाण येथे आरोपी राजू दीपा कोळी व गोपाल राजू कोळी हे आपल्या गावी आले असताना सापळा रचून त्यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा कबुल केला असून त्यांच्याकडून चोरीच्या ऐवजासह दोन मोटार सायकलही जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाई नंतर त्यांना बाजारपेठ पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भा.दं.वि. ३८० प्रमाणे गुम्हा नोंदवण्यात आला असून बाजारपेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.