राजकीय, राष्ट्रीय

तिहेरी तलाक पुन्हा लोकसभेत ; शबरीमलाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

शेअर करा !
1471075624 2983
 

दिल्ली (वृत्तसंस्था) भाजप सरकारने काही बदल करून तिसऱ्यांदा लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडले आहे. या विधेयकाला काँग्रेस आणि एमआयएमने कडवा विरोध केला असून शबरीमलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. रवीशंकर प्रसाद यांनी विधेयक मांडताच लोकसभेत विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

या विधेयकाला विरोध करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तिहेरी तलाक विधेयक घटनेतील 14 आणि 14 या तरतुदीचं उल्लंघन आहे. सरकारला मुस्लिम महिलांबद्दल मोहब्बत, मग शबरीमालातील हिंदू महिलांबाबत का नाही असा सवाल उपस्थित केला. तर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील या विधेयकाला कडवा विरोध केला आहे. हे विधेयक फक्त मुस्लिम महिलांपुरते मर्यादित न ठेवता सर्व धर्माच्या महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने एक कायदा करावा अशी मागणी शशी थरूर यांनी केली आहे. तसेच तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारे कलम आपल्याला अमान्य असल्याचेही थरूर यांनी सांगितले. भाजप सरकार मुस्लिम समाजाला लक्ष करत असल्याचा आरोपही थरूर यांनी केला आहे. तसेच सरकारच्या या विधेयकामागील हेतूवरच काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

मोदी सरकारच्या मागच्या कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयक आणले होते. मात्र, हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले नव्हते. डिसेंबरमध्ये हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षे शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. मात्र राज्यसभेत जेडीयूने या विधेयकाला विरोध केला होता.