क्राईम, जळगाव

मू.जे.तील खुनी हल्ल्याचे थरारक सी.सी.टी.व्ही. फुटेज ! (व्हिडीओ)

शेअर करा !

9c23a77e 2541 4668 bb24 d13a13c4a291

जळगाव (प्रतिनिधी) शहरात काल झालेल्या खुनाच्या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक अद्यापही सुन्न आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कॅमेऱ्यात खुनानंतरचा धावपळीचा काही भाग कैद झाला आहे. हा सगळा घटनाक्रम धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारा आहे.

  • spot sanction insta
  • advt tsh flats
  • Sulax 1

 

 

मु.जे.महाविद्यालयातील खून प्रकरण शहरात ८० च्या दशकातील गँगवॉरच्या दिवसांची आठवण करून देणारी ही घटना असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. मधल्या काळात जळगाव शहर चांगलेच शांतताप्रिय शहर झाले होते, पण आता पुन्हा तसलाच प्रकार डोके वर काढत नसावा ना..? अशी शंका उत्पन्न होवून संवेदनशील समाजमन व्यथित झाले आहे. काल मू.जे. महाविद्यालयात एका महाविद्यालयीन तरुणाची निर्घृण हत्त्या करण्यात आली. भरदिवसा ही थरारक घटना घडली, तेव्हा आसपास शेकडो तरुण लोक उपस्थित होते. महाविद्यालयातील पार्किंग एरियात असणारे सुरक्षारक्षक होते. अशावेळी खुनासारखा प्रकार करण्याला हे तरुण कचरले नाहीत, याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमका खून ज्या ठिकाणी झाला त्याच्या जवळ असलेला सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बंद होता, तरीही मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कॅमेऱ्यात खुनानंतरचा धावपळीचा काही भाग कैद झाला आहे. एकूणच सगळा घटनाक्रम धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा आहे.