क्राईम, जळगाव

बांधकाम ठेकेदाराच्या खून प्रकरणी तीन संशयित ताब्यात

शेअर करा !

d847f674 f0a0 4377 8dca 320f6fb3de5b

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खेडी पेट्रोल पंपा जवळ आज सकाळी एका बांधकाम ठेकेदाराचा खून प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

या संदर्भात अधिक असे की, खेडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास विपिन दिनकर मोरे (वय ३५ रा. खेडी) हे आपल्या दुचाकीवरून जात होते. याचवेळी तिघांनी येत त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. हा खून अमोल सोनवणे, शंकर सोनवणे आणि अरुण सोनवणे या तिघांनी केल्याचा संशयातून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे कळते. या हल्ल्यात विपिन हा जागीच ठार झाला होता.दरम्यान, विपिन आणि मारेकऱ्यांमध्ये अनेक दिवसापासून वाद होता. अनेकवेळा पोलिसात तक्रारी देखील झाल्या होत्या. परंतू आज थेट या वादातून विपिनचा खूनच झाला. तिघं संशयितांनाची कसून चौकशी सुरु आहे.