क्राईम, जळगाव

गोलाणी मार्केटमधील मोबाईल शॉपीमध्ये चोरी; दोन लाखांचे स्मार्टफोन्स लंपास

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या गोलाणी मार्केटमधील मोबाईल शॉपीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दोन लाख रूपयांचे स्मार्टफोन लंपास केल्याची बाब आज सकाळी उघडकीस आली आहे.

  • linen B
  • NO GST advt 1

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल शॉपीज मोठ्या प्रमाणात आहेत. यातील एका शॉपीमध्ये चोरट्टांनी हात साफ केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. यामध्ये माऊली मोबाईल अँड अ‍ॅसेसरीजमधील १७ स्मार्टफोन चोरी करण्यात आले असून याचे मूल्य सुमारे दोन लाख रूपये आहे. याशिवाय, एक ओंकार ही मोबाईल शॉपी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सुरेश प्रोव्हीजनमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आज उघडकीस आले आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीस प्रारंभ केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत गुन्हा नोंदणीचे काम सुरू होते.

Leave a Comment

Your email address will not be published.