क्राईम, जळगाव

जळगावात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडील वीज मोटारीची चोरी

शेअर करा !

download 4

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील रिंगरोडवरील शिवरंजनी अपार्टमेंट मधील रहिवासी असलेल्या एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या मालकीची विद्युत मोटार चोरीला गेल्याची घटना काल उघडकीस आली.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

 

अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उत्तम दीपचंद्र सोनवणे कुटूंबियांसह शिवरंजनी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. काल (दि.१० जुलै) सोनवणे कुटूंबीय रात्री जेवणानंतर नेहमीप्रमाणे झोपले. पहाटे ५.०० वाजता पाणी भरण्यासाठी ते उठले असता कंपाऊंडच्या कोपऱ्यातील विद्युत मोटार अद्यात चोरट्यांनी नेल्याचे आढळून आले. त्यामुळे उत्तम सोनवणे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.