क्राईम, जळगाव

जळगावातील अशोकनगरात घरफोडी

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्यानगरानजीक असणार्‍या अशोक नगरात आज पहाटे घरी कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी ६४ ग्रॅम सोने आणि सुमारे ७० रूपयांची रोकड लंपास केली आहे.

  • advt atharva hospital
  • vignaharta
  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • new ad

याबाबत माहिती अशी की, अशोकनगरातील प्लॉट क्रमांक १३ मध्ये अशोक फुलचंद जैसवाल यांचा निवास आहे. त्यांच्या काकांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब हे रात्री १२ वाजेच्या सुमारास खंडवा येथे गेले. यानंतर चोरट्यांनी घरात कुणीही नसल्याची संधी साधून कुलूप तोडून सुमारे चेन, अंगठी आदींच्या स्वरूपात असणारे ६४ ग्रॅम सोने आणि ७० हजार रूपयांची रोकड लंपास केली. आज पहाटे शेजारच्यांना घर उघडे दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात खबर देण्यात आली आहे.