क्राईम, चोपडा

ट्रकची छोटा हत्तीला जोरदार धडक: एक ठार, दोन जखमी

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

chopda

चोपडा (प्रतिनिधी)। येथील धरणगाव नाक्यावर हतनूर पाटचारी जवळील नगरपालिका उद्यानासमोर ट्रकने छोटा हत्ती रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याने त्यात रिक्षातील एक जण ठार झाल्याची घटना घडली असून ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. ट्रक चालकाविरोधा रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातून चोपडा धरणगाव रस्त्यावरिल इंडिया आईस फॅक्टरी कडे जाणारी छोटा हत्ती रिक्षा क्र. (एम.एच.१९ बी.एम.४७८६) या वाहनाला यावल कडून धरणगाव कडे जाणारा ट्रक क्र. (सी.जी.०४ जे.डी.३८९५) या वाहनाने मागून जोरदार धडक दिली त्यात छोटा हत्ती मधील भुपेंद्र कुमार लेखराम बाथम (वय-३५) रा.नवाबगांज (फरुखाबाद) हा युवक जागीच ठार झाला. तर रिक्षा ड्राईव्हर जगदीश सखाराम कोळी रा.बोरअजंठी पंकज अजयपाल कश्यप रा.तारामती नगर चोपडा हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • ssbt
  • election advt

रिक्षा ड्रायव्हर जगदीश कोळी यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक सुनिल सर्जू राठोड (वय-32) रा.चिरोडी जि. अमरावती याच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भाग ५ गुन्हा रजिस्टर न.४०/२०१९ भा.द.वि.कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा १८४,१३४(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपी अपघात स्थळावरून ट्रकसह फरार झाला होता मात्र काही युवकांनी ट्रकचा पाठलाग करून तालुक्यातील गलांगी गावाजवळव यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. सुनील पाटील हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published.