एरंडोल, धरणगाव, सामाजिक

एरंडोल-धरणगाव रस्त्याची दुर्दशा : वाहनधारकांची कसरत

शेअर करा !

erandol dharangaon road

बोरगाव, ता. धरणगाव प्रतिनिधी | एरंडोल-धरणगाव रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून हा राज्य महामार्ग असूनही त्यावर दोन -दोन फूट खोल असे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागचे ह्या खड्ड्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याने हे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे पडलेले असताना सततच्या पावसामुळे वाहन धारकांच्या अडचणीत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत येथे कधीही मोठा अपघात घडू शकतो, अशी शक्यता आहे. त्यामुळे संबंधितानी याची दाखल घेवून लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक नागरिक करत आहेत.