राजकीय, राज्य

आता प्रचारासाठी मजूर सोसायट्या पुरविणार चक्क रोजंदारी कार्यकर्ते

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

उस्मानाबाद (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच प्रत्येक राजकीय पक्षाला कार्यकर्त्यांची निकड भासू लागली आहे. हीच गरज लक्षात घेऊन येथील दोन मजूर सोसायट्यांनी चक्क प्रचाराला कार्यकर्ते पुरवले जातील अशा जाहिरातीच वृत्तपत्रातून दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार अनोखा ठरला आहे.

  • ssbt
  • election advt

 

ही जाहिरात त्यांनी फेसबुकवरही शेअर केली आहे. या जाहीरातीमुळे वाचणार्यांची करमणूक होत असली तरी जाणकारांकडून तिचे कौतुकही केले जात आहे. ही आयडिया यशस्वी ठरली तर राजकीय पक्षांची कार्यकर्ते आणण्याची मोठी डोकेदुखी कमी होणार आहे. त्याचवेळी या रोजंदारी मजुरांनाही काही दिवस हक्काचा भरघोस रोजगार मिळणार आहे. कारण या सोसायट्यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला कमीतकमी दोन हजार आणि जास्तीत जास्त कितीही कार्यकर्ते पुरवले जाणार असून त्यांना दर दिवशी एक हजार रुपये रोजगार द्यावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.