जामनेर, राजकीय, राज्य

जामनेर येथे किल्ले भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयाचा रा.कॉ. तर्फे निषेध (व्हिडीओ)

शेअर करा !

jamner 1

जामनेर प्रतिनिधी । शिवकालीन किल्ले पर्यटन स्थळ हे लग्नसमारंभासाठी तसेच भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाचा आज (दि. 7) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप-शिवसेना युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व किल्ले मोठ्या व्यवसायिकांना भाडेतत्त्वावर देऊन त्या ठिकाणी लग्नसमारंभ आणि हॉटेल व्यवसायकांना देण्याचा निर्णय शासनाने केलामुळे महाराष्ट्र शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून सरकाराने हा निर्णय लवकर रद्द करावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा ही यावेळी देण्यात आला. तसेच होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील, असे ही यावेळी सांगण्यात आले. याचबरोबर काही प्रमुख मागण्यांचे निवेदन ही देण्यात आले आहे. यावेळी संजय गरुड, अशोक चौधरी, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, स्नेहदीप गरुड, सागर कुमावत, जावेद मुल्लाजी, पुंडलिक पाटील, डॉ. बाजीराव पाटील, विशाल पाटील, विनोद माळी, पितांबर पाटील, देवानंद शिंदे, कैलास चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश वाघ, पांडुरंग पाटील, शिवाजी देशमुख, विनय करूळ, अमर पाटील, प्रल्‍हाद बोरसे, प्रशांत पाटील, विनोद दळवी, दिग्विजय सूर्यवंशी, विठ्ठल गरुड, श्रीराम धनगर, धरमवीर पठाण, वामन गावकर, तुषार चौधरी आणि नितीन गरुड यांच्यासह आदी उपस्थितीत होते.