राजकीय, राज्य

मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्ष वाटपाबाबत काहीही ठरले नव्हते : गडकरी

शेअर करा !
nitin gadkari

मुंबई (वृत्तसंस्था) अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटपाचे काहीही ठरले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार बनेल. दरम्यान, आवश्यकता भासल्यास आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

 

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल, असे यापूर्वीही म्हटले होते. तसेच या प्रकरणाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा कोणताही संबंध नाही. मी मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी दिल्लीतच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमत्रिपद घेण्याबाबत काही ठरले नसल्याचे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात राज्याचे सरकार बनेल, याचा पुनरुच्चारही गडकरी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड केली असून तेच मुख्यमंत्री बनतील असे गडकरी म्हणाले. दुसरीकडे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.