क्राईम, जळगाव

बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळल्याने जळगावात खळबळ

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव (प्रतिनिधी) येथील वाघ नगर परिसरात आज सकाळी मागील आठ ते दहा दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.

  • linen B
  • NO GST advt 1

या संदर्भ अधिक असे की, जानकी नगर (कंजरवाडा) परिसरातील रहिवाशी गोपी अशोक रावळकर(वय ४५) हे मागील आठ ते दहा दिवसापासून बेपत्ता होते. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास वाघ नगरमधील एका एका इमारतीच्या बांधकाम ठिकाणावरील भागातील  पाण्याच्या टाकीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी बघ्यांची एकाच गर्दी उसळली होती.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान, रावळकर हे हातमजुरी करायचे. त्यांना एक मुलगा एक मुलगी असल्याचे कळते.

Leave a Comment

Your email address will not be published.