जळगाव, सामाजिक

शहरात संत नामदेव महाराज यांच्यी ७४९ वी जंयती साजरी

शेअर करा !

WhatsApp Image 2019 11 08 at 5.38.56 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | स्वयंस्फूर्ती शिंपी समाज बहुउद्देशिय संस्था दादावाडी व श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती साजरी करण्यात आली.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रजलन व प्रतीमा पुजन करून करण्यात आली. यावेळी मनोज कुलकणीँ महाराज यांनी प्रवचन केले. याप्रसंगी जगताप सर, किशोर निकुंभ, दिलीप भामरे, शरद गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. डी. आर. शिंपी यांनी प्रस्तावित केले. जळगाव शहर अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. मुकुंदराव मेटकर, मनोज भांडारकर, विवेक जगताप, रामकृष्ण शिंपी, शरदराव बिरारी यांनी मनोगत व्यक्त केली. अध्यक्ष दादावाडी सुधाकर शिंपी यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी संजय आहिरराव, अशोक इसई, राजेंद्र सोनवणे, किशोर शिंपी व समाज बांधव व महिला मंडळ यांनी कामकाज पहिले.