क्रीडा, राज्य

टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका सुरू

शेअर करा !

cricket teem

नवी दिल्ली प्रतिनिधी । दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय संघात टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका होणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची कसोटी मालिका भारताने सहज खिशात घातली असली तरी, सलामीच्या जोडीची कामगिरी अपेक्षित होऊ शकली नाही. तसेच कसोटी संघात रोहित शर्माला सलामी स्थान मिळू शकते, असा अंदाज लावला जात आहे.

FB IMG 1572779226384

याबाबत अधिक माहिती अशी की, के.एल. राहुल ऐवजी रोहितला सलामीला खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार करत आहे. असे संकेत निवड समिती प्रमुख एसके प्रसाद यांनी दिले आहेत. मयांक अग्रवालने चमक दाखवली. परंतू के.एल. राहुल अपयशी ठरला. त्यामुळे कसोटी सामन्यात रोहितला सलामीला खेळवले जाऊ शकते. तसेच सलामीवीर राहुलची कामगिरी अपेक्षित होत नाहीय. त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. वेस्ट इंडीज दौऱ्यातही रोहितला कसोटी संघात संधी मिळाली नव्हती. मात्र, आता त्याच्या कसोटी संघातील समावेशाबाबत विचार करण्यात येत आहे. राहुल हा निश्चितच प्रतिभावान खेळाडू आहे. त्यामुळे राहुलऐवजी रोहितला सलामीला खेळवण्यात यावे, असे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे मत आहे.