राज्य, राष्ट्रीय

अनंतनाग येथील दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ल्यात १० जण जखमी

शेअर करा !

Terrorist

 

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे शुक्रवारी रात्री उशिरा सुरक्षादलावर दहशदवाद्यांनी ग्रेनेड फेकत हल्ला केला. अनंदनाग येथील उपायुक्त कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. या घटनेत 10 जण जखमी झाले आहेत.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या निशाण्यावर डीसी ऑफिसच्या बाहेर तैनात असलेले कर्मचारी होते. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यात १० लोक जखमी झाले. यात एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. हल्ल्यानंतर तातडीने सुरक्षा दलाची कुमक वाढवण्यात आली आणि परिसराला घेराव घालण्यात आला. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशनदेखील सुरू करण्यात आले आहे. आज जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला दोन महिने पूर्ण झाले आहेत.