ADVERTORIAL, अर्थ, जळगाव, ट्रेंडींग

सर्व प्रकारच्या बॅग्जसाठी एकच ठिकाण : टेमकर फॅन्सी बॅग ( व्हिडीओ )

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । सर्व प्रकारच्या बॅग्ज एकाच ठिकाणी हव्या असल्यास आपल्याला शहरातल्या भास्कर मार्केटमधील टेमकर फॅन्सी बॅग्ज येथे जावे लागेल. या दुकानात आपल्याला अगदी हव्या त्या प्रकारातील बॅग कस्टमाईज्ड करून मिळण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

लेदर, कापड अथवा रेक्झीनपासून बनविलेल्या बॅग्ज आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक आहेत. अगदी शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कूल/कॉलेज बॅग ही बाब अत्यावश्यक असते. प्रवासासह, दैनंदिन वापरासाठी विविध प्रकारच्या बॅग्ज आपल्याला लागत असतात. सध्या बाजारपेठेत अनेक देशी-विदेशी ब्रँडची उत्पादने उपलब्ध आहेत. तथापि, जळगावातल्या भास्कर मार्केटमधील टेमकर फॅन्सी बॅग या दुकानात आपल्याला अगदी स्थानिक पातळीवर आपणास हव्या असणार्‍या बॅग तयार करून देण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे कथित मोठ्या कंपन्यांच्या बॅग्जपेक्षा येथील उत्पादने ही अतिशय किफायतशीर मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

टेमकर फॅन्सी बॅगबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लाईव्ह ट्रेंड न्यूजने या फर्मचे संचालक गोपाल टेमकर यांच्याशी संपर्क साधला. याप्रसंगी ते म्हणाल की, मी स्वत: या व्यवसायात १९९९ पासून आहे. आधी फक्त बॅग दुरूस्तीचा व्यवसाय होता. नंतर मात्र ग्राहकांच्या मागणीवरून बॅग उत्पादन सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. आज टेमकर फॅन्सी बॅगमध्ये सर्व प्रकारच्या बॅग उपलब्ध आहेत. यात स्कूल बॅग, लॅपटॉप बॅग, प्रवासी बॅग आदींपासून ते विविध व्यावसायिकांसाठी आवश्यक असणार्‍या बॅग्ज उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे येथे ग्राहकाला हव्या असणार्‍या प्रकारातील बॅग तयार करून मिळते. यामुळे कुणीही त्याच्या आवश्यकतेनुसार हव्या त्या बॅगची ऑर्डर येथे देऊ शकतो. यानुसार येथे किफायतशीर मूल्यात ही बॅग बनवून मिळते. यामध्ये स्कूल व कॉलेजसाठी लागणार्‍या बॅग, सर्व प्रकारच्या प्रवासी बॅग्ज, लॅपटॉपसह अन्य उपकरणांसाठीच्या विशेष बॅग्ज, टिफीन बॅग्ज, सुटकेस आदींचा समावेश आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ग्राहकाने अगदी एक बॅगची ऑर्डर दिली तरी त्याला बॅग बनवून देण्याची सुविधा येथे देण्यात आल्याची माहिती गोपाल टेमकर यांनी दिली. तसेच त्यांच्याकडे खराब झालेल्या बॅग दुरूस्त करण्याची सुविधादेखील आहे.

संपर्क

टेमकर फॅन्सी बॅग
१३०, भास्कर मार्केट,
दक्षता पेट्रोल पंपासमोर, एम.जे. कॉलेज रोड, जळगाव
मोबाईल : ९९६०२२३१३७ व ८२०८७३३०३१

पहा : टेमकर फॅन्सी बॅगबाबतचा हा व्हिडीओ.

गुगल मॅप्सवर शोधा टेमकर फॅन्सी बॅगचे अचूक लोकेशन.