अमळनेर, चाळीसगाव, शिक्षण, सामाजिक

चाळीसगाव येथून निवडणूक प्रशिक्षण घेऊन परततांना शिक्षकाचा मृत्यू

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

WhatsApp Image 2019 04 13 at 6.49.49 PM

अमळनेर (प्रतिनिधी)  चोपड्या तालुक्यातील तावसे येथील शिक्षक हभप अंबादास चौधरी यांचे चाळीसगाव येथून निवडणूक प्रशिक्षण आटोपून घरी अमळनेर येथे परतत असताना त्यांचे चाळीसगाव बस स्थानकाजवळ चक्कर येऊन निधन झाले.

  • NO GST advt 1
  • linen B

 

तावसे येथील शारदा हायस्कूलचे शिक्षक हभप अंबादास चौधरी यांचे निवडणूक प्रशिक्षण आज चाळीसगाव येथे होते. हे प्रशिक्षण पूर्ण करून चौधरी घरी परतत असतांना चाळीसगाव बसस्थानकाजवळ चक्कर येऊन पडले.  त्यांना लागलीच येथील समर्थ  हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याची उपचार दरम्यान प्राणज्योत मालवली. ते  ५५ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा व एक मुलगी असा परीवार आहे. चौधरी यांच्या मृत्यूने शिक्षकामध्ये संताप व्यक्त होत आहे.  एवढ्या लांब प्रशिक्षण देऊन त्यातून निवडणूक आयोग काय साध्य करणार आहे? याला जबाबदार कोण?  असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे. चौधरी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्याच्या निवृत्तीला केवळ ३ वर्षाचा कालावधी शिल्लक  होता. चौधरी हे त्यांच्या सुमधुर कीर्तनाने सर्वत्र परिचित होते. अमळनेर तालुक्यात त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांचे अंतिमसंस्कार रविवार १४ एप्रिल रोजी करणायत येणार आहेत.

 

One Comment

  1. Eknath patil

    Add me

Leave a Comment

Your email address will not be published.