क्राईम, यावल, रावेर

बदनामीकारक फलक लावणाऱ्यांंवर कारवाई करा : काँग्रेसची मागणी (व्हिडीओ)

शेअर करा !

congres yaval nivedan

यावल, प्रतिनिधी | नामदार हरीभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याविरोधात राजकीय सुडबुद्धीने त्यांची बदनामी व मानहानी करणारे फलक शहरात विविध ठिकाणी लावणाऱ्या अज्ञात व्यक्तिचा जाहीर निषेध व्यक्त करून फलक लावणाऱ्या व्यक्तिचा शोध घेवुन तात्काळ पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, या मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे येथील पोउनि सुनिता कोळपकर यांना देण्यात आले.

  • spot sanction insta
  • advt tsh flats
  • Sulax 1

 

काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते व कॉंग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल पंचायत समितीचे गटनेते व पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल निळकंठ जंजाळे, नावरे सरपंच समाधान धनसिंग पाटील, धीरज कुरकुरे, राजेश कमलाकर करांडे, रहेमान खाटीक, शेख नईम शेख शरीफ, राजु एजाज पिंजारी, विक्की विजय गजरे, दिवाकर सतीश फेगडे, इमरान अहमद पिंजारी, भुषण राजु कोळी, प्रदीपसिंग पाटील, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, मोहम्मद शफी शेख रफियोद्दीन आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.