ADVERTORIAL, जळगाव, ट्रेंडींग

वस्त्र-प्रावरणांमधील आघाडीचे नाव सुरेश कलेक्शन्स & क्रियेशन ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । येथील सुरेश कलेक्शन्स & क्रियेशनमध्ये वस्त्र व प्रावरणांच्या अक्षरश: असंख्य व्हरायटीज उपलब्ध करण्यात आल्या असून याला ग्राहकांची पसंती मिळाली आहे.

  • vignaharta
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital
  • new ad
  • advt tsh 1

गत तब्बल ६६ वर्षांपासून जळगावकरांच्या अव्याहत सेवेत असणार्‍या सुरेश कलेक्शनमध्ये स्त्री-पुरूषांसाठी अनेक प्रकारच्या व्हरायटीज या वाजवी दरात उपलब्ध आहेत. खरं तर, सुरेश कलेक्शन्स & क्रियेशन म्हटल्यानंतर विवाहाच्या बस्त्यासाठीचे परिपूर्ण शो-रूम ही प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते. अर्थात, असे आहेदेखील. तथापि, याच्या जोडीला बालके वगळता स्त्री-पुरूषांसाठीचे विविध रेडीमेड वस्त्र ही येथील खासियत आहे. काळाचा आणि अर्थातच ट्रेंडींग फॅशनचा वेध घेऊन विविध ख्यातप्राप्त ब्रँडस्ची उत्पादने सादर करण्याला सुरेश कलेक्शनने सातत्याने प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने विख्यात देशी-विदेशी ब्रँडची वस्त्रे येथे उपलब्ध करण्यात आलेली आहेत.

खरं तर, फॅशन ही सातत्याने बदलत असते. यामुळे बदलत्या फॅशनचा वेध घेऊन सुरेश कलेक्शनमध्ये मोठ्या संख्येत व्हरायटीज देण्यात आल्या आहेत. अलीकडचा विचार केला असता, रेडी टू वेअर या प्रकारातील साडी, नऊवारी लुगडे, धोतर आदी उत्पादने येथे सादर करण्यात आलेले आहेत. तसेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ते घालत असलेले मोदी जॅकेटदेखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. हे सर्व प्रकार सुरेश कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. अगदी कमीत कमी ते जास्तीत जास्त या दोन्ही प्रकारांमधील मूल्य असणारी उत्पादने सुरेश कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत.

संपर्क:

सुरेश कलेक्शन अँड क्रियेशन

केळकर मार्केट समोर, गणेश मंदिराजवळ,
बँक स्ट्रीट, नवीपेठ जळगाव
०२५७-२२२५४०१

पहा :- सुरेश कलेक्शनबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.

गुगल मॅप्सवर पहा सुरेश कलेक्शनचे अचूक लोकेशन