क्राईम, जळगाव

सुप्रिम कॉलनीत एकावर चाकूने वार; सहा जणांविरोधात गुन्हा

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

Crime l 1

जळगाव प्रतिनिधी । तुला जास्त मस्ती आली असे म्हणून दमदाटी करून मारहाण करून एकावर चाकू हल्ला केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. तर जखमीस उपचारार्थ दाखल करण्यात आले.

  • advt atharva hospital
  • Online Add I RGB
  • vignaharta
  • advt tsh 1
  • new ad

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुप्रिम कॉलनीतील गजाजन महाराज मंदिराजवळ आकाश दिलीप परदेशी हे कुटूंबासह राहतात. रात्री नेहमीप्रमाणे कंपनीतून घरी आल्यावर जेवण करुन ते झोपले. रात्री दीड वजाता घराच्या दरवाजाचा ठोकण्याचा आवाज आला असता, ते उठले. काही कळण्याच्या आत निलेश सपकाळे, रुपेश सोनार दोघे रा. जैनाबाद, अनिल घुले, रा. रामेश्‍वर कॉलनी, राधे शिरसाठ रा.सुप्रिम कॉलनी हे आले. निलेशने चाकू लावून परदेशी यांना घराबाहेर आणले व दमदाटी केली. यावेळी रुपेशने हातातील चाकू परदेशी यांच्या दंडावर मारला. व सोबतच्या इतरांनीही काठ्यांनी मारहाण केली. आई सोडविण्यास आली असता, तिलाही शिवीगाळ करत दमदाटी केली. यानंतर चौघे कार (क्र. 0007 ) मधून निघून गेले. दरम्यान जखमी अवस्थेत कुटुंबियांनी परदेशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी परदेशी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात निलेश सपकाळे, रुपेश सोनार दोघे रा. जैनाबाद, अनिल घुले, रा. रामेश्‍वर कॉलनी, राधे शिरसाठ रा.सुप्रिम कॉलनी व इतर दोन जण अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.