राजकीय, राष्ट्रीय

कलम ३७० हटविण्याविरोधारात आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी

शेअर करा !

नवी दिल्ली, वृतसेवा | जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार बहाल करणारं कलम ३७० रद्द करण्यात आले आहे. परंतु, त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

वकील एम. एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी कलम ३७० रद्द करणे हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. यासोबतच विधानसभेतील प्रस्तावाशिवाय जम्मू-काश्मीर राज्याचे दोन भाग करण्यास अवैध म्हटले आहे.सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस, ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एस. अब्दूल नजीर यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी होणार आहे. या याचीकेशिवाय काश्मीर टाईम्स या  वृत्तपत्राच्या संपादक अनुराधा भसीन यांच्या याचिकेवरही सुनावणी केली जाणार आहे. ६ ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जाचा आधार असलेले कलम ३७० रद्द करण्याचे एतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर आज लोकसभेतही मंजूर झाले. यात ३५१ विरुद्ध ७२ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले.