क्राईम, भुसावळ

राजस्थानातील अपघातात नगरसेवकाच्या भाऊचा मृत्यू

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

भुसावळ प्रतिनिधी । राजस्थानातील अजमेरच्या जवळ झालेल्या अपघातात येथील नगरसेवक निर्मल कोठारी यांचे बंधू सुजीत यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Akshay Trutiya

याबाबत वृत्त असे की, येथील नगरसेवक कोठारी यांचे बंधू सुजित रमेश कोठारी हे कुटुंबीयांसह अन्य १४ जण वैष्णव देवी येथे देवदर्शनासाठी मिनीबसने जात होते. शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जोधपूरहून गाडी पुष्करला जात असताना पुढे जात असलेला ट्रेलर अचानक मागे येऊन मिनीबसला धडकला. या भीषण अपघातात गाडीतील १४ जण जखमी झाले. यातील सुजीत कोठारी (वय४५) यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published.