जळगाव, राजकीय

आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे आ. भोळे यांच्या प्रचारास शुभारंभ

शेअर करा !

WhatsApp Image 2019 10 12 at 4.46.13 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे विविध ठिकाणी जनसंपर्क करून प्रचार कार्य सुरु करण्यात आले आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

मतदारांची भेट घेत जळगाव शहरात भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी जळगाव शहरचे जिल्हा संयोजक ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदे, यशवंत नामदेव पाटील, नंदू शुक्ल, गजानन फडे, भूषण मुळे, निखिल पोहणकर हे आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर घरोघरी जाऊन जनसंपर्क करत आहेत. महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांचा विजयासाठी जळगाव शहरातील विविध कीर्तनकार,कथाकार तसेच पुरोहित वर्गांकडून पाठिंबा मिळाला आहे असे भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी जळगाव शहरचे जिल्हा संयोजक ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदे यांनी कळविले आहे.