चोपडा

चोपडा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

शेअर करा !

chopada spardha

चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.१३) ‘युवा संसद’ कार्यक्रमातंर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी केले. तद्नंतर त्यांनी माजी शिक्षणमंत्री कै.ना.मा. शरश्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.

  • Sulax 1
  • advt tsh flats

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी होते. याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, स्पर्धेचे समन्वयक मिलिंद पाटील, क्रीडा समन्वयक आर.पी. आल्हाट, उपप्राचार्य प्रा.बी.एस. हळपे, पर्यवेक्षक प्रा.व्ही. वाय. पाटील व प्रा. माया शिंदे उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा.ए.बी. सुर्यवंशी, प्रा.डी.एस. पाटील व प्रा.एम.एल. भुसारे यांनी काम पाहिले.

विजयी स्पर्धक :-  प्रथम – भाग्येश राजेंद्र सोनवणे (स्वच्छ भारत अभियान), ए.एस.सी. कॉलेज चोपडा, द्वितीय – जयश्री देविदास कोळी, प्रधानमंत्री पिक योजना, सी.बी. निकूंभ विद्यालय घोडगाव, तृतीय – काजल बाळू सोनवणे, स्वच्छ भारत अभियान, झेड.टी. महाजन विद्यालय धानोरा प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.बी.एस. हळपे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.एन.बी. शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.व्ही.डी. शिंदे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा.एन.बी. पाटील, प्रा.एस.एन. नन्नवरे, प्रा. किशोर राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थी व शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.