क्राईम, राजकीय, राज्य

चिदंबरम यांच्या भेटीसाठी सोनिया गांधी, मनमोहन सिंग तिहार तुरूंगात

शेअर करा !

tiheri

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरूंगात असलेल्या माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तिहार तुरूंगात पोहचले आहे. गेल्या एका महिन्यापासून चिदंबरम हे तुरूंगात आहे. त्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत अधिक माहिती अशी की, चिदंबरम हे गेल्या ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत. दरम्यान, चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह आज सकाळी 9 वाजता तिहार तुरूंगात दाखल झाल्या आहेत. ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या चिदंबरम यांच्या पाठिंशी काँग्रेस असल्याचे दर्शवण्यासाठी सोनिया गांधी या चिदंबरम यांच्या भेटीला आल्याची चर्चा आहे. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ति चिदंबरम हेही त्यांच्यासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभव, राहुल गांधी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा व चिदंबरम यांच्यासारख्या नेत्याच्या अटकेनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेल्याची दिसत होती. मात्र, सोनियांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध राज्यांत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. पक्षाला लढण्याच्या स्थितीत आणण्याचा सोनियांचा प्रयत्न आहे. चिदंबरम यांची भेट हा याचाच भाग असल्याचं बोललं जात आहे.