क्राईम, भुसावळ

कुत्र्याला डिवचले म्हणून भुसावळात उगारल्या दोन तलवारी ! ( व्हिडीओ )

शेअर करा !
bsl cctv footage
हातात तलवार घेतलेले राहूल सोनटक्के.

भुसावळ प्रतिनिधी । लहान मुलाने आपल्या कुत्र्याला डिवचले म्हणून एकाने चक्क दोन तलवारी बाहेर काढल्याची धक्कदायक घटना शहरातील म्युनिसिपल पार्कमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत वृत्त असे की, आज दुपारी शहरातील म्युनिसिपल पार्क परिसरात एक लहान मुलगा आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या मतपत्रिका क्रमांकाच्या पावत्या वाटत होता. दरम्यान, याच परिसरातील रहिवासी असणारे राहूल रमेश सोनटक्के यांच्या भुंकणार्‍या कुत्र्याला त्या मुलाने डिवचले. यामुळे सोनटक्के यांनी त्या मुलाशी वाद घातला. सोबत असणार्‍या मुलाच्या वडिलांनी (किशोर वासुदेव बुटी ) याबाबत विचारणा केली असता राहूल सोनटक्के हे हातात तलवार घेऊन बाहेर येऊन त्यांनी संबंधीत बाप-मुलास धमकावले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली असून उपनिरिक्षक वैभव पेठकर हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, हातात दोन तलवारी घेऊन बाहेर आलेले राहूल सोनटक्के हे बाजूच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. हे फुटेज खास आपल्यासाठी सादर करत आहोत.

पहा : राहूल सोनटक्के यांचा हातात तलवारी घेऊनचा व्हिडीओ.