क्राईम, राज्य

पुण्यात शिवसैनिकांकडून इफको टोकियो कंपनी कार्यालयाची तोडफोड

शेअर करा !

eefco tokio company

पुणे प्रतिनिधी । पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकिओ या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, संगणक, खुर्च्यांची तोडफोड केली असून ही घटना आज (दि.6) सकाळी घडली आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

या तोडफोड प्रकरणी शिवसेना शहर पक्ष प्रमुख संजय मोरे म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांच्या हक्कांचे पैसे मिळावे. म्हणून, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पीक विम्याचे पैसे दिले जातील असे आश्वासन विमा कंपन्यांकडून दिले गेले होते. मात्र अद्याप देखील पैसे दिलेले नाही. त्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर पैसे द्यावे, अन्यथा आणखी तीव्र लढा उभारला जाईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.