क्राईम, जळगाव

शेतात चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

शेअर करा !

Crime

जळगाव प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील शेतकरी शेतात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास काम करत असतांना अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत माहिती अशी की, रामधन धनजी पाटील (वय ४५) रा. माळपिंप्री ता. जामनेर हे शेतात कोळपणीचे काम करत असताना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास चक्कर येऊन खाली पडले, ही बाब त्यांच्या बाजूच्या शेतात काम करणारे त्यांचे चुलत भाऊ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश दहातोंडे यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. या घटनेबाबत जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.